या एक दिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवाल आणि अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

सेमिनारचे फायदे -

आयुष्यात आपण जे जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. आपण कोणती कामे करणार किंवा सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती यश किंवा अपयश मिळालं यावरच ठरते. त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो.

पण काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडू शकत नाही. पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही.

अशावेळी लोकं आपल्याला सांगतात “कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता आहात, त्या ऐवजी थोडा सकारात्मक विचार करा म्हणजे यश तुमचेच असेल”. मग लगेचच आपण ठरवतो देखील की आता मी फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करणार. पण जेमतेम १०/१५ मिनिटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”, पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते की दृष्टीकोन कसा बदलायचा. ते जे सांगताहेत त्याप्रमाणे खरेच घडते किंवा नाही ह्याची पडताळणी त्यांनी केलेली नसते किंवा त्याचा अनुभव देखील घेतलेला नसतो. त्यानी ते कुठेतरी ऐकलेले असते आणि असे ऐकीव ज्ञान दुसऱ्यांना सांगायला एकदम मस्त वाटते म्हणुन ते ज्ञान??? आपल्याला चिटकवून, तसं करायला ते सांगून टाकतात.

जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते. फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाडा नेहमीप्रमाणे तसाच पुढे ढकलत राहतो.

जर माणसाची बौद्धिक, मानसिक किंवा शारीरिक पात्रता यश ठरवत असती तर आज प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती यशस्वी असती. प्रत्येक शारीरिकदृष्ट्या मजबूत माणूस दुसऱ्यांवर भारी असता; पण तसं नसतं. यशाची शाश्वती नसतेच आणि हे माहीत असतानाही प्रत्येकजण आपापल्यापरीने कार्यरत असतोच आणि आपापल्या कुवतीनुसार एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचलेलाही असतो. कमीजास्त प्रमाणात यश-अपयश प्रत्येकाने अनुभवलेले असतेच...

मग हा सेमिनार कुणासाठी? आणि कुणी तो का करावा?

-आयुष्यात एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर सुद्धा तिथेच न थांबता काही लोकांना त्याहीपेक्षा खूप पुढे जायचे असते. ते जिथे पोहोचलेत त्याच्याही पुढे त्यांना जायचे असते. हे शक्य आहे ह्याची त्यांना खात्री असते. पण कसे? हा मोठा प्रश्नचिन्ह असतो.

पण त्या प्रश्नातच अडकून न राहता ते त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांना खात्री असते की काहीतरी नाविन्यपूर्ण किंवा काहीतरी वेगळे केल्यानेच त्यांना हवे असलेले यश मिळेल. आणि हे यश त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देवून, आयुष्याचं सोनं करू शकेल. अशा काही संधी निर्माण होतील ज्यांची ह्या क्षणी आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यासाठी त्यांना फक्त कुणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते.

-काही लोकं असेही असतात की ज्यांना काहीही मेहनत न करताच सर्वकाही मिळवायचं असतं आणि प्रत्येक गोष्ट जी त्यांना हवी आहे ती मिळविण्याची त्यांना अतिशय घाई असते. ते कोणत्याही गोष्टीची वाट बघण्याच्या मनस्थितीत कधीच नसतात. जे हवं आहे ते मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. सर्व प्रयत्न फसल्यावर, अगदी तोंडावर आपटल्यावर ते अशा यशाच्या शोधात असतात जो यश त्यांना समाधान देईल.

-आणखी एक प्रकार असा असतो जो सदैव दबावाखाली जगतो. काही करण्याची धमकच त्यांच्यात क्वचितच आढळते किंवा ती धमक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली असते. आत्मविश्वास आणि स्वाभिमान म्हणजे काय ह्याचा गंधही त्यांना नसतो. त्यामुळे जे आहे तेच टिकविण्यात त्यांचे आयुष्य खर्ची होते. कितीही मोठी संधी असली तरीही तिथे बघण्याची हिम्मत देखील ही लोकं करत नाहीत, पण नशिबाच्या नावाने बोटे मात्र नक्कीच मोडतात. काहीतरी चमत्कार घडावा ही अपेक्षा मात्र ते नित्यनेमाने करतात.

ह्यापेक्षा आणखीनही काही स्तर असतात. तुम्ही कोणत्याही स्तरावर का असेना पण तुम्हाला हे पक्के ठाऊक असते की तुम्ही ह्याच्याही खूप पुढे गेला असतात जर...

मंत्र यशाचा ह्या एकदिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.

नोंदणी करा