Marathi | English
Follow us:
सेमिनार
 
    मंत्र यशाचा
    वेळ अनमोल
    संकल्पसिद्धि
    कॉर्पोरेट ट्रेनिंग
    वैयक्तिक मार्गदर्शन
 कॉर्पोरेट ट्रेनिंग

गरजेप्रमाणे सेमिनारची रूपरेषा

  • वेळ अनमोल
  • कम्युनिकेशन स्कील
  • ताण तणाव व्यवस्थापन
  • टीम बिल्डिंग
  • सेलिंग स्कील
  • मंत्र यशाचा
  • लीडरशीप स्कील
  • संकल्प सिद्धी

मोठमोठ्या कंपन्या किंवा व्यावसायिक संस्था/संघटना यात वेगवेगळया स्तरांचे/ व्यक्तिमत्वाचे असंख्य लोकं, आपापल्या कंपनीची किंवा संस्थेची अंतिम उद्दिष्ट साध्या करण्यासाठी एकत्र काम करतात. जसजसा वेळ जात असतो तसतसे या व्यक्तिमत्वांचे वेगवेगळेपण किंवा रंग दिसायला लागतात. काही यशात सहभाग देतात तर काही अपयशास कारणीभूत ठरतात. काही प्रत्येक कामात नेहमीच पुढे असतात व सर्वाना सोबत घेवून काम करतात तर काही एकटे पडतात किंवा नेहमीच बांधावर बसलेले असतात.

या प्रत्येक व्यक्तीमत्वामध्ये काही वेगळेपण किंवा एक नैसर्गिक देणगी/कला/कुशलता असते आणि जर त्यांनी ती पूर्णपणे वापरली तर कोणतेही काम अशक्य नसेल. पण कुठेतरी त्यांच्यातील गुणांचा वापर करवून घेण्यात कंपन्या कमी पडतात किंवा त्यांच्यातील गुणांची जाणीव त्या कंपनीलाच काय पण त्या व्यक्तीला देखील नसते. आणि जरी असेल तरी कित्येक वैयक्तिक किंवा प्रासंगिक कारणांमुळे ती दडवलेली असते.

प्रत्येक कंपनीच्या गरजा, कंपनीची वाटचाल, त्यात असलेल्या स्टाफचा सहभाग किंवा कंपनीच्या वाढत्या वाटचालीमुळे निर्माण होणारे बदल आणि गरजा; त्यांच्या त्या गरजांबाबत स्टाफ कडून असलेल्या अपेक्षा इत्यादी गोष्टींचा कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये खोलवर विचार केला जातो व या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशिक्षणाचा मसुदा तयार केला जातो, अगदी प्रत्येकाच्या गरजेनुसारच.

या प्रशिक्षणा नंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक समान धागा निर्माण होण्यास मदत होते आणि अगदी साध्या कामगारापासून ते व्यवस्थापनापर्यंत सर्वजण एकाच ध्येयावर एकत्र येतात आणि त्या त्या कंपनीचा अधिकृत चेहरा बनतात.

 
Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.