Marathi | English
Follow us:
सेमिनार
 
    मंत्र यशाचा
    वेळ अनमोल
    संकल्पसिद्धि
    कॉर्पोरेट ट्रेनिंग
    वैयक्तिक मार्गदर्शन
 वैयक्तिक मार्गदर्शन

वैयक्तिक मार्गदर्शन हि एक व्यक्तिगत सेवा आहे जी कोणत्याही व्यक्तीला हवे असलेले असाधारण यश मिळवून देते. तुम्ही ज्यासाठी वचनबद्ध आहात ते मिळविण्यात सहकार्य केले जाते आणि त्याचा आराखडा बनविण्यात येतो. गरजेप्रमाणे आठवडा/ पंधरवडा/ महिन्यातून एकदा भेटून मार्गदर्शन करण्यात येते. सोयीप्रमाणे फोनवर किंवा प्रत्यक्ष हे मार्गदर्शन दिले जाते. सद्य परिस्तिथी किंवा जे परिणाम साधायचे आहेत ते कशाप्रकारे साधता येतील ते ठरवणे हे ह्या भेटीचे ध्येय असते. सद्य परिस्तिथीचा कशा प्रकारे उपयोग होवू शकतो किंवा करून घेवू शकतो याचे मार्गदर्शन प्रशिक्षक (कोच) करत असतो.

या मार्गदर्शनामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे पाहायला सुरुवात करता व आपल्या जीवनात त्याचा लाभ घ्यायला सुरुवात करता.

प्रशिक्षक तुम्हाला ध्येय, प्रकल्प वगैरे बनवून देण्यात मदत करतात जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरून तुम्हाला हवे असलेले आयुष्य दृष्टीक्षेपात आणू शकता आणि यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन प्रभावी ठरते. व्यक्तिगत मार्गदर्शन मिळाल्यास आपण कोणतीही गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो, थोड्या वेळात जास्तीत जास्त कामे करू शकतो आणि संभावित ठिकाणी स्वबळावर जेवढ्या वेळेत पोहोचू शकलो असतो त्याच्या कितीतरी आधी पोहोचतो.

आपल्यातील त्रुटी किंवा कमतरता आपण स्वतः सहजपणे पाहू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला हवं ते मिळविण्यात असंख्य अडथळे पार करावे लागतात, ज्यांची आपण कल्पना देखील केलेली नसते. पण मार्गदर्शन लाभल्यास स्वतःतील गुणदोषांचा उपयोग जे हवं ते मिळविण्यात होतो आणि त्यावेळी तुम्ही एकटे नसता तर तुमचा प्रशिक्षक देखील तुमचा सोबती असतो आणि त्यामुळे असाधारण परिणाम देखील अगदी सहजपणे मिळविले जातात. जीवनाला एक गती प्राप्त होते. चालढकल तुमच्या आयुष्यातून हद्दपार होते; अगोदर जे अशक्य दिसत होते ते सहज शक्य होते.

 

 
Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.