Marathi| English
Follow us:
सेमिनार
 
    मंत्र यशाचा
    वेळ अनमोल
    संकल्पसिद्धि
    कॉर्पोरेट ट्रेनिंग
    वैयक्तिक मार्गदर्शन
 मंत्र यशाचा

या एक दिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही परिस्तिथीवर प्रभुत्व मिळवाल आणि अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

 • प्रतिबंधक समजुतीपासून मुक्ती
 • इच्छित परिणाम साधने
 • मनातील भीती हद्दपार
 • जीवनात आनंद आणि विश्वासाची वृद्धी
 • जिथे मी तिथे संधी
 • स्वाभिमान
 • आत्मविश्वास
 • लक्षपूर्वक ऐकणे
 • मनोगत प्रभावीपणे व्यक्त करणे
 • आपल्या सर्वाना आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. काहीवेळा आपल्याला यश मिळतं तर कधी अपयश येतं. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतं. कित्येक वेळा आपण कोणती कामे करणार किंवा सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात यश किंवा अपयश मिळालं यावर ठरतं; त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो. पण काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडू शकत नाही. पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश आपल्याला मिळत नाही. अशावेळी लोकं सांगतात कि कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता, तर सकारात्मक विचार करा. आपण देखील ठरवतो कि मी आता फक्त सकारात्मक विचार करणार पण जेमतेम १०/१५ मिनिटं आणि नंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारात कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाच कळत नाही.

  काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”, पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते कि तो कसा बदलायचा. त्यानीही कुठेतरी ऐकलेले असते आणि ऐकायला आणि सांगायला बरे वाटते म्हणुन आपल्याला देखील तसं करायला सांगून टाकतात. जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते; फरक काहीच नसतो आणि आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाढा असाच पुढे ढकलत राहतो.

  दुसऱ्या प्रकारची लोकं अशी असतात कि ज्यांना त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे हे माहित असतं पण ते करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात नसते त्यामुळे फक्त कारणं देण्यातच ते धन्यता मानतात. आयुष्याला कलाटणी देवू शकेल किंवा आयुष्याचं सोनं करू शकेल अशी संधी आहे, याची कल्पना असून देखील ते त्यावर दुर्लक्ष करतात, आणि ते देखील योग्य कारण देवूनच. आयुष्यात त्यांच्याकडे कारणांची कमी नसते, अगदी आयुष्य घडवणारं सेमीनार आहे हे माहित असताना देखील ते न करण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य कारण असतं.

   
  Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.