Marathi | English
Follow us:
सेमिनार
 
    मंत्र यशाचा
    वेळ अनमोल
    संकल्पसिद्धि
    कॉर्पोरेट ट्रेनिंग
    वैयक्तिक मार्गदर्शन
 वेळ अनमोल

या एक दिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही जीवनाची अनिश्चितता हाताळून आपल्या आयुष्याच्या उद्देशावर ठाम राहाल

  • चालढकल आणि टाळाटाळ हद्दपार
  • आयुष्याच्या दिशा
  • आयुष्याची स्पष्ट संकल्पना
  • ध्येय एक स्फुर्तीस्थान
  • नियोजन
  • ताण तणाव, दडपण व बेबनाव हाताळणे
  • मन शांत परंतु ध्येयावर केंद्रित
  • वेळ व्यवस्थापनाचे महत्व
  • वेळ व्यवस्थापनातील अडचणी

वेळ व्यवस्थापनाबद्दल आपली अशी समजूत असते कि एक वेळापत्रक किंवा दैनंदिनी बनवायची आणि त्याप्रमाणे काम करायचे, म्हणजेच वेळ व्यवस्थापन. पण कित्येक वेळा आपण जे लिहून ठेवलेले असते ते न करता काहीतरी वेगळेच करत असतो; हे क्वचित नव्हे तर अगदी नेहमीच होत असतं. लिहून ठेवलेल्या काही गोष्टी आपण करतो देखील पण बहुतेक कामे आपण उद्यावर ढकलत असतो आणि तो उद्या सहजासहजी येत नाही. कधीकधी तीच कामे काही वर्ष देखील पूर्ण होत नाहीत, आणि झाली तरी त्याचं समाधान मिळत नाही. तरीदेखील आपण चालढकल करणे सोडत नाही.

आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची असते आणि त्यासाठी वेळ द्यायचा असतो, मग ते काम व्यावसायिक /कौटुंबिक /सामाजिक किंवा आणखी काही असेल, पण ते त्याचं वेळी करणे निकडीचे असते. ते करण्यासाठी आपण कोणकोणत्या दिव्यातून जातो हे फक्त आपल्यालाच माहित असते आणि एवढी सर्व दिव्ये पार करून देखील आपण कुठेतरी कमी पडतो. या सर्वातून जाताना चुकून कधीतरी थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी मिळतो पण त्याचवेळी काहीतरी अघटीत घडते आणि ती आणीबाणी हाताळण्यात सर्व वेळ किंबहुना आयुष्यच निघून जाते.

वेळ अनमोल सेमीनार केल्यावर तुम्ही लोकांना वेळ तर देताच पण त्याचबरोबर तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी देखील तुमच्याकडे भरपूर वेळ असतो.

 
Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.