कॉर्पोरेट प्रशिक्षण

एकत्रित वाटचाल यशाकडे

मोठमोठ्या कंपन्या किंवा व्यावसायिक संस्था/संघटना यात वेगवेगळया स्तरांचे/ व्यक्तिमत्वाचे असंख्य लोकं, आपापल्या कंपनीची किंवा संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात. जसजसा वेळ जात असतो तसतसे या व्यक्तिमत्वांचे वेगवेगळेपण किंवा रंग दिसायला लागतात. काही यशात सहभाग देतात तर काही अपयशास कारणीभूत ठरतात. काही प्रत्येक कामात नेहमीच पुढे असतात व सर्वाना सोबत घेवून काम करतात तर काही एकटे पडतात किंवा नेहमीच बांधावर बसलेले असतात.

या प्रत्येक व्यक्तीमत्वामध्ये काही वेगळेपण किंवा एक नैसर्गिक देणगी/कला/कुशलता असते. जर त्यांनी ती पूर्णपणे वापरली तर कोणतेही काम अशक्य नसते. पण कुठेतरी त्यांच्यातील गुणांचा वापर करवून घेण्यात कंपन्या कमी पडतात किंवा त्यांच्यातील गुणांची जाणीव त्या कंपनीलाच काय पण त्या व्यक्तीला देखील नसते. आणि जरी असेल तरी कित्येक वैयक्तिक किंवा प्रासंगिक कारणांमुळे ती दडवलेली असते. बहुतेकवेळा कंपनीपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक लाभाची काळजी करणारेच खूप जास्त असतात.

प्रत्येक कंपनीच्या गरजा, कंपनीची वाटचाल, त्यात असलेल्या स्टाफचा सहभाग किंवा कंपनीच्या वाढत्या वाटचालीमुळे निर्माण होणारे बदल आणि गरजा; त्यांच्या त्या गरजांबाबत स्टाफ कडून असलेल्या अपेक्षा इत्यादी गोष्टींचा कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये खोलवर विचार केला जातो व या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशिक्षणाचा मसुदा तयार केला जातो, अगदी प्रत्येकाच्या गरजेनुसारच.

या प्रशिक्षणा नंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक समान धागा निर्माण होण्यास मदत होते आणि अगदी साध्या कामगारापासून ते व्यवस्थापकापर्यंत सर्वजण एकाच ध्येयावर एकत्र येतात आणि ते त्या कंपनीचा अधिकृत चेहरा बनतात.

खालील विषयांवर कार्यशाळा व चर्चासत्र घेण्यात शैलेश तांडेल सुप्रसिद्ध आहेत. 

 • मंत्र यशाचा
 • वेळ अनमोल
 • प्रभावी संवाद
 • व्यक्तिमत्व विकास
 • टीम बिल्डींग
 • नेतृत्वगुण विकास
 • विक्री चातुर्य
 • नातेसंबंध विकास
 • आत्मविश्वास आणि आत्मसन्मान
 • ताण-तणावावर मात
 • भूतकाळाच्या गर्तेतून मुक्तता

ठळक वैशिष्टे

 • गरजेप्रमाणे सेमिनारची रूपरेषा
 • फक्त तुमच्याच संस्थेतील निवडक लोकांचे प्रशिक्षण
 • एकमेकांशी संबंधात सहजपणा व मोकळेपणा
 • झोकून देणाऱ्या वृत्तीची निर्मिती
 • संस्थेच्या वाटचालीत लोकांचा सहभाग व ध्येयावर एकमत
 • संस्थेच्या मूळ उद्देशाला अनुसरून पुढील वाटचाल
 • एकमेका सहाय्य करण्यास तत्पर
 • संस्थेची व्यावसायिक व आर्थिक प्रगती
 • अंतिमतः कर्मचारी, अधिकारी व भागधारकांची प्रगती

Fields marked with * are required