शैलेश तांडेल यांचा टाईम मॅनेजमेंट वरील विनामूल्य सेमिनार- ठाणे

दिनांक व वेळ
शनिवार २ जून २०१८ सायंकाळी ६.४५ ते ८.४५ वाजेपर्यंत

सेमिनारचे ठिकाण
हॉटेल मौर्य रेसिडेन्सी, फलाट क्रमांक १ समोर, बाळ गणेश उड्डाण पुलाजवळ, जांभळी नाका, रेल्वे स्टेशन रोड, ठाणे (प) ४००६०१

टाईम मॅनेजमेंट साठी कोणत्या मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते? आणि त्याची सुरुवात कशी करावी?

वेळ व्यवस्थापनाचे मुलभूत धडे मिळवा अगदी विनामुल्य, टाईम मॅनेजमेंट गुरु शैलेश तांडेल यांच्याकडून.

सर्वसाधारण लोकांच्या मते वेळेच्या व्यवस्थापनासाठी जर सर्वात काही महत्वाचं असेल तर ते वेळापत्रक बनविणे. जर वेळापत्रक बनवता आले तर मग काम करणे सोपे होऊन जाते. पण कित्येकवेळा ते कसे बनवितात हेच माहित नसतं तर काहीवेळा ते कसे बनवायचे हे माहित असले तरीही आपण त्याप्रमाणे काम करूच ही शाश्वती जवळजवळ नसतेच. बहुतेकवेळा आमचं ज्ञान दुसऱ्यांना देण्यासाठीच असतं त्यामुळे स्वतःसाठी आम्ही ते क्वचितच वापरतो.

वेळापत्रक बनविण्याची फक्त माहिती असून नाही चालत तर वेळापत्रक बनवून त्या बनविलेल्या वेळापत्रकावर कृती देखील करावी लागते. ठरवलेल्या गोष्टी ठराविक वेळेत पूर्ण देखील कराव्या लागतात आणि त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते पण ते नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीत जमतेच असेही नाही.

पण त्याचबरोबर वेळापत्रक बनवायला पाहिजे हे माहित असताना देखील ते बनवायचे टाळणे म्हणजे असलेल्या समस्या आणखीनच वाढवून स्वतःच स्वतःला खड्यात ढकलण्यासारखे असते.

हे जर टाळायचे असेल आयुष्यात सुसूत्रता आणायची असेल तर...

शनिवार दिनांक २ जून २०१८ रोजी संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ठाण्यात होणाऱ्या टाईम मॅनेजमेंट गुरु शैलेश तांडेल यांच्या विनामुल्य टाईम मॅनेजमेंट सेमिनारसाठी आजच नोंदणी करा. 

शैलेश तांडेल यांचा हा दोन तासांचा टाईम मॅनेजमेंट वरील विनामूल्य सेमिनार तुम्हाला वेळेच्या व्यवस्थापनातील काही मुलभूत गोष्टी शिकवून तुम्हाला तुमचे आयुष्य काही टक्क्यांनी का होईना पण नियोजनबद्ध करायला नक्कीच मदत करेल.

पुढील वाटचालीसाठी तुम्ही आमच्या आगामी कार्यशाळांमध्ये भाग घेऊ शकता.

वेळ अनमोल - टाईम मॅनेजमेंटवर मराठीतून १ दिवसीय कार्यशाळा

शैलेश तांडेल यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी

आगामी कार्यशाळा

टाईम मॅनेजमेंट वरील विनामूल्य सेमिनार- ठाणे