19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली परंतु ३० सप्टेंबर २०२३ ती कायदेशीर निविदा असेल. ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर मेम फेस्टला पूर आला आणि त्याच वेळी हे चलन काढून घेण्याच्या विरोधात देखील पोस्ट्स सुरू झाल्या.
दोन हजाराची नोट जर बंद होत असेल तर त्यासाठी एवढं आरडओरडा करायची काय गरज आहे? नोटबंदीच्या वेळी तुम्ही व्यवहार करू शकत नव्हता पण आता ३० सप्टेंबर पर्यंत २० हजारापर्यंतची रक्कम तुम्ही बदलून घेउऊ शकता पण जर त्यापेक्षा मोठी रक्कम असल्यास बँकेत जमा करू शकता आणि त्याचबरोबरीने दोन हजाराची नोट व्यवहारात पुढच्या १३० दिवसांपर्यंत वापरू शकता त्यामुळे समस्याच नाही आहे.
नोट बंदी झाल्यावर लोकांच्या हातात पटकन पैसे येणे गरजेचे होते त्यामुळे कदाचित ५०० आणि दोन हजाराच्या नोटा छापल्या गेल्या असाव्यात आणि आता त्या मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे त्यामुळे दोन हजाराच्या मागोमाग पुढच्या काही काळात ५०० ची नोट देखील बंद केली जाऊन १०० किंवा जास्तीत जास्त दोनशेच्याच नोटा व्यवहारात कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
ज्या देशात डिजिटल पेमेंटचे एवढे जबरदस्त जाळे विणलेले आहे आणि लोकं जर त्याचा मुक्तहस्ते वापर करत असतील तर त्या देशात मोठ्या नोटांची गरजच कुठे उरते?
दुसरे म्हणजे पुढील काही काळात जगभरात येऊ घातलेल्या मंदीची लाट. भारतात त्याची शक्यता नाही आहे पण अडकून राहिलेल्या पैशापेक्षा चलनात असलेला आणि सरकारच्या नियंत्रणात असलेला पैसा अशा वेळी जास्त उपयुक्त ठरतो.
आणि तसेही सामान्य माणसाला या नोटा मागे घेण्याची कोणतीही समस्या नाही आहे तर ज्यांनी तो दाबून ठेवलाय त्यांची व्यथा व्यक्त होतेय त्यामुळे त्यांची रडारड समजण्यासारखी आहे.
Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Time Management Coach | Relationship Coach | Professional Mentor | Soft Skill Trainer | Life Skills Trainer | Searchlight Within | Entrepreneur | Discipline |



