मी मराठी

क्ष किंवा ज्ञ हे अक्षर कसे लिहावे या संभ्रमात एकेकाळी पडलो होतो मी आणि तेही महानगरपालिकेच्या मराठी शाळेतून शिक्षण घेतल्यावर. आणि हो रात्र महाविद्यालयात (नाईट कॉलेज) मध्ये त्यावेळी मी बारावीला होतो आणि बारावी पर्यंत मराठी हा विषय शिकवला जात होता तरीही… १९८६ मध्ये एका कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागल्यावर सर्वकाही इंग्रजीत लिहिणे सुरु […]

बोध घ्यायचा की उसासे सोडायचे?

कुणी आत्महत्या केली किंवा एखाद्याला एकाकी मरण आले की मेसेजेसचे महापूर येतात. पूर्वीचेच मेसेज नव्याने मुलामा देऊन फॉरवर्ड करायला आम्ही सुरुवात करतो पण खरंच त्याची गरज असते का? त्या मेसेजमध्ये हिटलर, सुशांत सिंघ, भय्यूजी महाराज पाहिजेतच नाहीतर तो पूर्ण होत नाही. कालपरवा रवींद्र महाजनी एकाकी वारले त्याबरोबर नातेसंबंधांवर मेसेज सुरु झाले. हिटलर जिवंत पकडला जाऊ […]

परदेशात स्थायिक होण्याचे फायदे आणि तोटे: एक महत्वपूर्ण मूल्यमापन

परदेशात स्थायिक होण्याचे फायदे आणि तोटे यांचे जे मूल्यमापन लाइफ कोच आणि बिझनेस मेंटॉर शैलेश तांडेल यांनी केले आहे त्यानुसार त्यामधील आव्हाने, संधी, कार्यसंस्कृती याबद्दल एक महत्वपूर्ण माहितीचा खजिना तुमच्यासमोर उघड होत आहे. तसेच परदेशात स्थायिक झाल्यानंतर तेथील लोकांसाठी तुम्ही कायम एक बाहेरचेच असता याची देखील जाणीव करून देतो. त्याचबरोबरीने तुम्ही परदेशात स्थायिक व्हाल किंवा […]

भाषा, संस्कृती आणि सिनेमा: छुप्या अजेंड्याचे अनावरण

या अभ्यासपूर्ण लेखनाद्वारे भाषा आणि संस्कृतीचे संबंध जाणून घेऊन आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करण्याची गरज असलेल्या भाषेच्या जाणीवपूर्वक होणार्‍या अध:पतनाचा शोध घ्या. आपल्या परंपरा जपण्याचे महत्त्व जाणून घ्या आणि ज्या ऐतिहासिक व्यक्तींनी भाषेचे संरक्षण केले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपली भाषा, चालीरीती आणि वारसा संरक्षित करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करण्यासाठी कृती करण्यास सुरुवात करा.

‘यशस्वीपणे करिअर संक्रमण’

बर्‍याच वेळा आपल्याला नोकरी बदलण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो परंतु समोर दिसणाऱ्या आश्वासक भविष्यासाठी कोणालाही दुखावल्याशिवाय करिअरमधील संक्रमण यशस्वीपणे कसे हाताळायचे याबद्दल अनेकदा गोंधळ होतो. ते करिअर संक्रमण सहजतेने हाताळण्यासाठी लाइफ कोच आणि बिझनेस मेंटॉर शैलेश तांडेल यांचा ब्लॉग, ’यशस्वी करिअर संक्रमण’.

डिजिटल पेमेंट आणि मोठ्या नोटांच्या मागणीचा विरोधाभास

19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली परंतु ३० सप्टेंबर २०२३ ती कायदेशीर निविदा असेल. ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर मेम फेस्टला पूर आला आणि त्याच वेळी हे चलन काढून घेण्याच्या विरोधात देखील पोस्ट्स सुरू झाल्या. दोन हजाराची नोट जर बंद होत असेल तर त्यासाठी एवढं […]

उद्योजकाची शिस्त

कोणत्याही कंपनीचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते. शिस्त असेल तर प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियोजनानुसारच घडत असते. नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने यश मिळेलही पण तीच किमया कायम साधणे शक्य नसते. शिस्त नसेल तर जिंकणे फक्त नशिबाचाच भाग […]

आपत्ती व्यवस्थापन ते फॉर्च्युन ५०० कंपनी

२४ जुलै १९८९ या दिवशी मुसळधार पावसाने आणि १००/१५० किमी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने मुंबई ते कोकणाला अक्षरशः झोडपून काढले होते; ज्यात कित्येक लोकं मृत्युमुखी देखील पडले होते. नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणाऱ्या पाताळगंगा परिसरात देखील रात्रभर ८/१० तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता. पाताळगंगेतील त्या शंभरेक […]

शैलेश तांडेल

व्यवसाय सुरु करायचा विचार करताय?

सोमवार म्हणजे रविवारची सुट्टी मनसोक्त उपभोगल्यानंतर अंथरुणातून उठण्याचा कंटाळा किंवा जबरदस्तीने उठण्याची सजा किंवा काहीतरी मनाविरुद्ध, वगैरे वगैरे वगैरे… सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा माझ्या बाबतीत कधीच नव्हता कारण कामे टाळण्याचा स्वभाव अगदी सुरुवातीपासूनच नसल्याने सर्वच दिवस माझ्यासाठी सारखेच. हे सांगायचं कारण म्हणजे, आजच्याच दिवशी ३२ वर्षांपूर्वी सोमवार दिनांक ६ मार्च १९८९ या दिवशी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर […]

सहा ग्रह आकाशात दिसताहेत तेही दुर्बिणीशिवायच

काही दिवसांपूर्वी कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना चंद्राच्या बाजूला बहुतेकांना एक लाल रंगाचा तारा दिसला असेल, तो लालसर तारा म्हणजेच मंगळ ग्रह. जर कोजागिरी साजरी केली नसेल किंवा लक्ष फक्त चंद्रावरच किंवा दुधावरच केंद्रीत केलेले असेल तरीही हरकत नाही. तुम्ही तो मंगळ ग्रह आजही पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जागे राहण्याचीही आवश्यकता नाही […]

आयुष्याचा समतोल…स्त्रीला लाभलेली दैवी देणगी

(माझा हा लेख स्मार्ट उद्योजक मासिकाच्या २०१९ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे त्यामुळे ज्यांना तो काही कारणास्तव तिथे वाचता नाही आला अशा माझ्या वाचकांसाठी मी इथे तो जसाच्या तसाच देत आहे.) स्मार्ट उद्योजकाच्या दिवाळी अंकात ह्या वर्षीही लिहिणार का असं विचारणा झाल्यावर सर्वप्रथम विचार करायला लागलो की नक्की लिहू तरी कशावर? नेमकं विचारणा झाली […]

परिक्रमाच तर करत असतो आपण

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परिक्रमाच तर करत असतो आपण. जन्मल्याबरोबर आईला बिलगून राहतो आणि जरासे पाय फुटले की सतत तिच्या आणि वडिलांच्या पुढेमागे घिरट्या घालायला लागतो. थोडेसे मोठे झालो की मित्र मैत्रिणीच्या मागेपुढे प्रदक्षिणा व्हायला लागतात. कालांतराने बॉसच्या आणि कुटुंबाच्या गोल गोल परिक्रमा करण्यात आणि पैशाच्या परिक्रमेत तर आयुष्य निघून जाते त्यामुळे तुम्ही कुणीही असा पण प्रदक्षिणा किंवा […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराणा कावकाव त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे जाणवतो. दोन सारख्याच दिसणाऱ्या पण […]

मनाप्रमाणे जगण्यासाठी अगोदर मन मोकळे तर करा

काही महिन्यांपूर्वी ’99’ नावाच्या एका कन्नड चित्रपटाबद्दल ऐकले होते. त्यावेळी ऑनलाईन शोधताना कळलं की तो विजय सेथुपथी आणि त्रिषा कृष्णन यांच्या ’96’ नावाच्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. दोघेही उत्तम नट-नटी आणि मला आवडणारे त्यामुळे बघितला व खूप आवडला मला. तामिळ आणि हिंदी डब ह्या दोन्हींमध्ये मी हा चित्रपट पाहिला आहे. हिंदी डब छानच आहे पण […]