भाषा, संस्कृती आणि सिनेमा: छुप्या अजेंड्याचे अनावरण

या अभ्यासपूर्ण लेखनाद्वारे भाषा आणि संस्कृतीचे संबंध जाणून घेऊन आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करण्याची गरज असलेल्या भाषेच्या जाणीवपूर्वक होणार्‍या अध:पतनाचा शोध घ्या. आपल्या परंपरा जपण्याचे महत्त्व जाणून घ्या आणि ज्या ऐतिहासिक व्यक्तींनी भाषेचे संरक्षण केले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपली भाषा, चालीरीती आणि वारसा संरक्षित करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करण्यासाठी कृती करण्यास सुरुवात करा.

सहा ग्रह आकाशात दिसताहेत तेही दुर्बिणीशिवायच

काही दिवसांपूर्वी कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना चंद्राच्या बाजूला बहुतेकांना एक लाल रंगाचा तारा दिसला असेल, तो लालसर तारा म्हणजेच मंगळ ग्रह. जर कोजागिरी साजरी केली नसेल किंवा लक्ष फक्त चंद्रावरच किंवा दुधावरच केंद्रीत केलेले असेल तरीही हरकत नाही. तुम्ही तो मंगळ ग्रह आजही पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जागे राहण्याचीही आवश्यकता नाही […]

आयुष्याचा समतोल…स्त्रीला लाभलेली दैवी देणगी

(माझा हा लेख स्मार्ट उद्योजक मासिकाच्या २०१९ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे त्यामुळे ज्यांना तो काही कारणास्तव तिथे वाचता नाही आला अशा माझ्या वाचकांसाठी मी इथे तो जसाच्या तसाच देत आहे.) स्मार्ट उद्योजकाच्या दिवाळी अंकात ह्या वर्षीही लिहिणार का असं विचारणा झाल्यावर सर्वप्रथम विचार करायला लागलो की नक्की लिहू तरी कशावर? नेमकं विचारणा झाली […]

अंधाराशी लढण्याऐवजी प्रकाश निर्माण करूया

नकारात्मक लोकांना प्रत्येक उपायात समस्या दिसते आणि खरोखरच्या समस्येत हीच लोकं ऑस्ट्रीच पक्षासारखी जमीनीत मान खुपसून बसतात. माझ्या कार्यशाळेत कित्येकदा मी लोकांकडून अशी काही कामे / ऍक्टिव्हिटीज करून घेतो जी करायला काही लोकांना विचित्र वाटते पण ती केल्यानंतर त्यांना जाणवतं की हे सर्व त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे. कार्यशाळेत मोजकीच लोकं असतात आणि इथे प्रश्न १३० […]

आई-वडीलांबद्दल कृतज्ञता आणि त्यांचा आयुष्यावरील प्रभाव

सकाळी झोपेतून उठलो तेच मुळी रडत कारण अचानक सकाळी सकाळीच बाबांच्या मृत्यूची बातमी घेऊन हॉस्पिटलमधून वार्डबॉय आला होता. इंग्रजी तारखेप्रमाणे २२ नोव्हेंबर १९७८ आणि हिंदू तिथीप्रमाणे देवदिवाळी नंतरचा सातवा दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण सप्तमी. तुळशी विवाहाच्या सातच दिवसांनी ४० वर्षांपूर्वी माझ्या बाबांना देवाज्ञा झाली आणि आम्ही धडाक्यात साजरी केलेली दिवाळी अचानक संपली. बाबा डॉक्टरकडे कधीच […]

वेळेला महत्व असते हे कळण्याची पण वेळ यावी लागते !

आतापर्यंत बहुतेक शाळा / कॉलेजांच्या परीक्षा संपून एव्हाना सुट्ट्या सुरु झालेल्या असतील किंवा काही ठिकाणी त्या लवकरच सुरु होतील आणि त्याचबरोबर सुरु होईल द ग्रेट हॉलिडे  सर्कस. मुख्य कलाकार पालक व बालक. कधी एकदा सुट्टी पडते आणि मस्त धमाल करायला मिळते ही बच्चे कंपनीची स्वप्ने. पण त्याचवेळी पालकांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत असतात. आता […]

संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो

प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच जगत कल्याणासाठी श्रीविष्णूने घेतलेला सातवा अवतार. पण माझ्या मते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम. राम […]

महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिन म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो… वर्षातला एक दिवस महिला दिवस…फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल. प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे शक्य असेल? पण ज्या पश्चिमी देशांमध्ये कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे किंबहुना वेळ काढलाच जात […]

Pressure

पण…नियोजनबद्ध आयुष्याची सुरुवात तर करा.

परेशान थी चम्पुकी वाईफ नॉन हेपनिंग थी उसकी लाईफ चम्पुको न मिलता था आराम ऑफिसमें करता था काम ही काम चम्पू के बॉस भी थे बडे कूल प्रमोशन को हर बार जाते थे भूल पर भुलते नही थे वो डेडलाईन काम वो करवाते थे टील नाईन चम्पू भी बनना चाहता था बेस्ट इसलिये वो नही […]

Opeing Door to Success

दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो

काही दरवाजे जरी उघडले तरीही ते आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत कारण तो रस्ता नसतोच मुळी. आणि जरी असला तरीही प्रगतीच्या मार्गावर नेणारा तर तो हमखास नसतो. पण असे कितीतरी अनावश्यक आणि दिशाभूल करणारे दरवाजे रोजच्या रोज उघडतच असतात आपल्या आयुष्यात. पण ते कुठे घेऊन जातात हे मात्र काळच ठरवतो. २०१५ च्या वर्ल्डकपची भारत विरुद्ध […]

Blog on Dr. Abdul Kalam

भारताचे अंटार्टिका मिशन आणि डॉक्टर अब्दुल कलाम

काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाचे अंटार्टिका मधील वास्तव्याचे अनुभव ऐकण्यासाठीच मी गेलो होतो. अंटार्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिणेचा निर्मनुष्य भाग. संपूर्ण बर्फाळ प्रदेश जिथे हवा ७०/८० ताशी किलोमीटर वेगाने वाहते त्यामुळे दूर उडून जाऊ नये म्हणून स्वतःला बांधून घ्यावे लागते आणि जिथे उन्हाळ्यात सहा महिने दिवस आणि थंडीत सहा महिने रात्र. आपल्यासारखे १२/१२ तासांनी तिथे दिवसरात्र होत […]

Marathi Bhasha Din

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ त्यांच्या जयंतीदिनी सुरु झालेला हा सोहळा. जो एकदिवसा पुरते का होईना पण मराठी माणसाला आणि मराठी भाषेला स्फुरण चढवण्याचा काम नक्कीच करतोय. सोशल मेडियाच्या माध्यमामुळे, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा सोहळा म्हणजे मातृभाषेसाठी ऊर भरून येण्याचा दिवस. जर सोशल मेडिया नसता तर याचे किती लोकांना अप्रूप वाटले […]

Taking charge of Time

नुसती वाट पाहून हाती येतं फक्त म्हातारपण

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. काही असेही असतात जे यश मिळविण्याची फक्त इच्छा व्यक्त करतात तर काही यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करतात […]

एक पाऊल पुढे टाकून तर बघा

एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात. आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते. आयुष्य त्यांचेच बदलते जे त्या गर्दीतून बाहेर पडायची हिंमत दाखवतात. आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते आपला मार्ग स्वतः निवडतात. कोणत्याही […]