वैयक्तिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन

पथ निर्मिती ते ध्येयपूर्ती 

आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते आणि ते देखील लवकरात लवकर. आपल्या कुवतीवर मजल दरमजल करत आपण एका स्तरापर्यंत तर पोहोचतो पण कित्येकवेळा त्याच्यापुढे जाण्यासाठी आपली कोणतीही कृती, युक्ती किंवा कोणतीही योजना कामी येत नाही. स्वतःकडून किंवा इतरांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत जसे सर्व काही एकाच जागी थांबलेले आहे. अशावेळी त्या विशिष्ट विषयात पारंगत असलेल्या व्यक्तीचे सहकार्य अतिशय मोलाचे ठरते. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेलच असे नाही आणि जरी असली तरीही ती तुमच्यासाठी वेळ काढेलच याचीही शक्यता जवळपास नसतेच.

पण म्हणून तिथेच थांबणे किंवा त्या व्यक्तीला सवड मिळेपर्यंत वाट बघणे म्हणजे...
आतापर्यंत मिळविलेल्या यशावर पाणी फिरवण्यासारखे असते कारण जो थांबला तो संपला हा जगाचा नियम.

अशावेळी काही सेमिनार/कार्यशाळा केल्या जातात आणि त्याचा उद्योगधंद्यात आणि वैयक्तिक आयुष्यात चांगला फायदा देखील होतो. त्यामुळे काही लोकं सतत कोणता ना कोणता सेमिनार करून आपली ध्येये शक्य तेवढ्या लवकर गाठण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढत असतात.

पण काही स्वप्ने आणि महत्वाकांक्षा तसेच काही समस्या खूप मोठ्या असतात ज्यासाठी खास अशा एका व्यक्तीची गरज लागते जी आपल्याला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करेल. जर तसे मार्गदर्शन मिळाले तर अगदी अशक्यात अशक्य गोष्ट देखील शक्य होऊन जाते.

हे मार्गदर्शन फक्त व्यवसायापुरते मर्यादित नसते तर त्याचबरोबर तुमच्या काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या ज्याने तुमचे जगणे असह्य केलेले असते, अशा गोष्टी ज्या लोकांसमोर येणे गैरसोईचे असते आणि त्यासाठी त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज भासते. त्या मार्गदर्शनाने अगदी खोलवर पाळेमुळे रुजलेल्या समस्यांचेही सहज निवारण होते.

दुसऱ्यांतील त्रुटी आम्हाला सहजच जाणवते पण आपल्यातील त्रुटी किंवा कमतरता आपण स्वतः सहजपणे पाहू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला हवं ते मिळविण्यात असंख्य अडथळे पार करावे लागतात, ज्यांची आपण कल्पना देखील केलेली नसते.

वैयक्तिक मार्गदर्शक तुमच्यातील सूक्ष्म गुणांना पारखून तुम्हाला हवे असलेले असाधारण यश मिळवून देण्यात मोलाचा वाट उचलते. हे मार्गदर्शन गरजेप्रमाणे आठवडा/ पंधरवडा/ महिन्यातून एकदा भेटून करण्यात येते. ज्यामुळे संभावित ठिकाणी स्वबळावर जेवढ्या वेळेत आपण पोहोचू शकलो असतो त्याच्या कितीतरी आधी पोहोचतो.

वैयक्तिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनातून कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करू शकता?

  • आयुष्यात जे महत्वाचं आहे त्याची स्पष्टता व त्यांचा ध्येय आणि उद्देशाशी योग्य समन्वय साधणे.
  • आयुष्यात आपला ठसा नक्की कुठे उमटवायचा आहे त्याची स्पष्टता.
  • कृतीयोजना तयार करून ती प्रभावीपणे प्रत्यक्षात आणणे.
  • आपले म्हणणे प्रभावीपणे कसे मांडावे, लोकांशी जुळवून घेऊन एकत्र काम कसे करावे तसेच नेतृत्व कसे करावे?
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नातेसंबंधात सहजतेने कसे वावरावे?
  • कामगिरीत सातत्य राखून त्यात वृद्धी कशी करावी?
  • आयुष्यात जिवंतपणा कसा आणावा? आयुष्याचा उपभोग कसा घ्यावा?
  • संधी निर्माण करण्यास उपयुक्त व आव्हान घेण्यास किंवा धोका पत्करण्यास सज्ज करणाऱ्या वातावरणाची निर्मिती कशी करावी?
  • कोणत्याही परिस्थितीसमोर न बिथरता जे हवे ते साध्य कसे करावे?
  • आपल्यापेक्षा अवाढव्य वाटणारे इप्सित साध्य कसे करावे?
  • आयुष्याच्या सतत बदलणाऱ्या उतार-चढावात सहजतेने वावरून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जावे?
  • कोणत्याही गोष्टीत आवड किंवा उत्कटता कशी निर्माण करावी?
  • नातेसंबंधातील प्रेम आणि जवळीक कशी जपावी?
  • कुणालाही न दुखवता प्रभावीपणे मन मोकळे कसे करावे?

काही विशिष्ट क्षेत्रे जिथे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे याची तुम्ही अपेक्षा करता...

  • ठराविक वेळेत उद्दिष्टे साध्य करणे
  • रागावर नियंत्रण ठेऊन शांत मानाने काम करायला शिकणे
  • आयुष्याचा समतोल
  • निरंतर यशप्राप्ती
  • वैयक्तिक व व्यावसायिक मार्गदर्शन
  • उद्देशाची स्पष्टता
  • भूतकाळ भूतकाळातच ठेवायला शिकणे
  • स्वाभिमान आणि आत्मविश्वास
  • निर्णय क्षमता
  • प्रभावी संभाषण कौशल्य
  • भावनिकदृष्ट्या संतुलित
  • उत्पादकता वाढविणे
  • निरंतर पुढे वाटचाल
  • कौटुंबिक एकता
  • परिस्तिथीवर मात करायला शिकणे
  • उद्योगाची निरंतर वाढ
  • आयुष्यातील संक्रमणे समर्थपणे हाताळणे
  • निरोगी नातेसंबंध
  • नेतृत्व कौशल्य
  • कार्यकारी प्रशिक्षण
  • कार्यकारी मार्गदर्शन
  • वैयक्तिक व व्यावसायिक मार्गदर्शन
  • वर्तमानात जगणे
  • उत्कटतेने व उत्साहात जगणे
  • जोडीदाराबरोबर प्रेमाचे व विश्वासाचे नाते
  • संपूर्ण जीवन प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन
  • अपयशाची भीती हद्दपार
  • अपराधीपणाच्या गर्तेतून बाहेर पडणे
  • पालकत्व
  • वैयक्तिक व व्यावसायिक वाढ
  • वैयक्तिक वाढ
  • व्यक्तिमत्व विकास
  • व्यावसायिक नातेसंबंध
  • ताणतणावावर मात
  • वेळेचे व्यवस्थापन
  • जीवन परिवर्तन

ठळक वैशिष्टे  

  • फक्त दोघांमध्येच एका विशिष्ट विषयावर संवाद
  • कोणत्याही अडथळ्याविना तुमचं म्हणणे संपूर्ण ऐकून समस्येवर तोडगा.
  • काय महत्वाचं आहे त्याची स्पष्टता आणि त्याचा ध्येय आणि आयुष्याच्या उद्देशाशी योग्य समन्वय.
  • आयुष्याशी निगडीत ध्येयांची संरचना करणे व योग्य सरावाने ते प्रत्यक्ष आचरणात आणून एका विशिष्ट वेळेत पूर्ण करणे.
  • कधीकाळी विचार करण्यासही कठीण वाटणाऱ्या ध्येयांना प्रत्यक्षात आणणे किंवा कधीही सोडविता येणार नाही असे वाटत असलेली समस्येचा मुळासकट नायनाट.
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधून आयुष्य संपूर्णपणे जगण्यास समर्थ.

Life Coach | Business Mentor | Shailesh Tandel |

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या १०/१५ वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये परिस्थिती उद्योगाला तेवढी पूरक नव्हती. त्यावेळी मराठी माणूस आणि उद्योग म्हणजे जशी उत्तर आणि दक्षिण धृवाची परस्परविरोधी.टोकं. एकंदरीत उद्योगधंद्यात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच कारण उद्योगात पडणे म्हणजे खूप मोठी जोखीम जिथे तुमच्याकडे असलेले सर्वकाही तुम्ही हरवून बसाल आणि जेव्हा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा साहस नव्हे तर सुरक्षिततेला अधिक प्राधान्य असते त्यामुळे कदाचित उद्योगधंद्यात मराठी माणसाचे प्रमाण अगदीच नगण्य होते.

जर परिस्थिती उद्योगाला पूरक नव्हती तर ती वयाची विशीही पूर्ण न केलेल्या आणि हातात कोणतेही भांडवल वा मार्गदर्शन...पुढे वाचा>>>

Schedule Your ONE HOUR Personal Session according to your Comfort by Clicking on Red Dot

PAY NOW for Life Coaching & Business Mentoring ONE HOUR Session