अंधाराशी लढण्याऐवजी प्रकाश निर्माण करूया

नकारात्मक लोकांना प्रत्येक उपायात समस्या दिसते आणि खरोखरच्या समस्येत हीच लोकं ऑस्ट्रीच पक्षासारखी जमीनीत मान खुपसून बसतात.

माझ्या कार्यशाळेत कित्येकदा मी लोकांकडून अशी काही कामे / ऍक्टिव्हिटीज करून घेतो जी करायला काही लोकांना विचित्र वाटते पण ती केल्यानंतर त्यांना जाणवतं की हे सर्व त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे.

कार्यशाळेत मोजकीच लोकं असतात आणि इथे प्रश्न १३० करोड भारतीयांचा आहे जे सध्या सर्व काही सोडून लॉकडाऊन मुळे आपापल्या घरात बसलेली आहेत.

मजदूर असो अथवा उद्योजक त्या प्रत्येकाला उद्याची चिंता असणं स्वाभाविक आहे आणि टाळ्या वाजवून किंवा घराच्या इलेक्ट्रीक लाईट बंद करून दिवे पेटवल्याने कोरोना आटोक्यात येईल अशा भाबड्या आशेवर नाही जगत कुणी पण त्याचबरोबर या निराशाजनक वातावरणात सुतकी चेहऱ्याने फिरणारा किंवा भीक देऊन पांगळा करणारा नेताही नको असतो बहुतांश जनतेला.
अशावेळी धीर देण्यापेक्षा गरज असते निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मनाला उभारी देण्याची.

माझ्या कार्यशाळेत लोकांना आधार देण्यापेक्षा ते स्वबळावर कसे उभी राहू शकतात यावरच माझा भर असतो आणि लोकांनाही तेच हवं असतं.

ज्या काही विज्ञानवादी वगैरे पोस्ट सोशल मीडियावर फिरताहेत त्यांना फक्त एकच सांगावसं वाटतं की एकेकाळी नमस्कार हे देखील मागासलेपणाचे लक्षणच होते पण आता संपूर्ण जगाला त्यात विज्ञान दिसतंय त्यामुळे नका घाई करू विज्ञानाच्या प्रदर्शनाची.

लोकं घराबाहेर पडू शकत नाहीत पण जर का सर्वजण एकाच वेळी एकच कार्य करत असतील तर ते मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांशी सहज जोडले जातात आणि एकजूट होऊन लढताना कितीही मोठी लढाई देखील सोपी होऊन जाते.

आणि ही वेळ आहे सर्वांनी एकजुटीने काम करण्याची कारण ही एकट्या-दुकट्याची समस्या नाही आहे तर आंतरराष्ट्रीय आपदा आहे.

विज्ञानवादी युरोप-अमेरीकेची अवस्था बघतोय आपण आणि त्यामानाने कोरोनाला आपण आतापर्यंत तरी थोपवून ठेवले आहे आणि त्यासाठी जेवढं देशाचं नेतृत्व कंबर कसून उभं आहे तेवढीच या देशाची जनता.

आणि हो मी २२ मार्चपासून घरातच आहे; मी टाळ्या वाजवल्या होत्या आणि शंख देखील. उद्या ५ एप्रिलला दिवे नक्कीच लावेन अगदी खरेखुरे.

तसेही अंधार नको नको करत बसण्यापेक्षा प्रकाश निर्माण करायचा असतो.

Shailesh Tandel

Time Management Guru | Relationship Guru | Corprate Trainer | Life Coach | Business Mentor
Posted in प्रेरणादायी, मंत्र यशाचा.

Leave a Reply