वेळ अनमोल

वेळ निर्माण करून आयुष्याचा समतोल साधण्यासाठी!

दैनंदिन जीवनात आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि सहसा एकच पर्याय आपल्याकडे नेहमी असतो आणि तो म्हणजे जिथे आग लागली तिथे विझवा. त्यामुळे आपल्या आवडी-निवडी देखील बहुतेक वेळा परिस्थितीजन्य असतात. आमची कृती देखील त्या परिस्थितीवरच अवलंबून असते त्यामुळे आम्हाला जे काही अगदी मनापासून मिळवायचं असतं ते मिळविण्यास आमच्याकडे वेळ कधीच शिल्लक नसतो. एक ना धड आणि भाराभर चिंध्या हे आमचं नेहमीचेच न संपणारे वास्तव असतं.

आमच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या समस्यांपैकी काही समस्या म्हणजे... 

 • वेळ प्रभावीपणे वापरून नियोजनबद्ध आयुष्य जगायचं तरी कसे?
 • अपेक्षित फळ एका विशिष्ट वेळेत मिळवावे तरी कसे?
 • वेळ कसा वापरला तर आयुष्य सार्थकी लागेल?
 • कुटुंब आणि कार्यालय ह्यात समतोल साधून स्वतःसाठी वेळ कसा काढावा?
 • थोड्या वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत?
 • चालढकल करण्याच्या सवयीवर मात कशी करावी?
 • आयुष्याची अनिश्चितता हाताळावी तरी कशी?

आमच्याकडे सर्व समस्या सोडविण्याचा एकच रामबाण उपाय असतो आणि तो म्हणजे वेळापत्रकात जेवढ्या जास्त गोष्टी टाकता येतील तेवढ्या टाकायच्या आणि तसे केल्याने आपल्या सर्व समस्यांचं निरसन होईल आणि आपले आयुष्य संपूर्णतः बदलून जाईल ही भाबडी आशा किंवा अपेक्षा बाळगायची. पण...

वेळापत्रकात जे जे टाकलेले असते ते काही ना काही कारणांनी अपूर्ण राहते आणि सरसकट आजचे काम उद्यावर ढकलले जाते. त्यानंतर उद्याचे परवावर;

लवकरच आम्हाला जाणीव होते की तो उद्या/परवा परत कधी आमच्या आयुष्यात उगवतच नाही. त्यामुळे आमची कामेच नाही तर आमचे आयुष्य देखील कुठेतरी त्रिशंकू प्रमाणे अधांतरी लटकत राहते पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये. पुढे जाता येत नाही आणि मागेही परतता येत नाही. हे सर्व गोष्टींमध्ये ऐकायला छान वाटत असतील परंतु प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच नाही. पण तरीही हे प्रत्यक्षात अनुभवण्याची पीडा आपल्यापैकी खूप जणांनी भोगलेली असते किंवा अजूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण सतत शोधत असतो.

वेळेचे व्यवस्थापन केल्याशिवाय आयुष्याचे व्यवस्थापन करणे केवळ अशक्य असते पण आम्ही मात्र कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःवर जेवढा जास्त होईल तेवढा दबाव टाकत असतो पण शेवटी एक वेळ अशी येते जिथे मन आणि शरीर साथ सोडते आणि ध्येय कायम अधांतरी राहतात किंवा कायमचे लुप्त होऊन जातात. जर ह्या त्रिशंकू अवस्थेतून बाहेर पडायचे असेल आणि वरील प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर...

वेळ अनमोल कार्यशाळेत आजच नोंदणी करून तुम्हाला हवे असलेले परिणाम मिळवायला शिका.

वेळ अनमोल ह्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये तुम्हाला नेहमीच हवे असणारे परिणाम मिळवायला शिका आणि त्याचबरोबर दडपण, ताण-तणाव आणि चालढकल वगैरे कसे हाताळावे तेही शिका; फक्त एकाच दिवसात!!!

वेळ अनमोल कार्यशाळेमध्ये भाग घेतलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुख्यतः खालील फायदे अनुभवले आहेत:-

 • वेळ व्यवस्थापनाचे महत्व
 • वेळ व्यवस्थापनामधील अडचणींवर मात
 • वेळमर्यादा पाळणे
 • चालढकल आणि टाळाटाळा हद्दपार
 • नियोजन
 • आयुष्याच्या दिशा
 • ताण-तणाव व दडपण हाताळणे
 • आयुष्याचा समतोल

कार्यशाळा कुणासाठी?

कमीतकमी वेळात जास्तीतजास्त परिणाम साधण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी.

तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी, खासगी कर्मचारी, सरकारी कर्मचारी असाल किंवा अगदी सेवानिवृत्त; अगदी सर्वांसाठीच लाभदायक.

Time Management & Relationship Guru Shailesh Tandel

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या १०/१५ वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये परिस्थिती उद्योगाला तेवढी पूरक नव्हती. त्यावेळी मराठी माणूस आणि उद्योग म्हणजे जशी उत्तर आणि दक्षिण धृवाची परस्परविरोधी.टोकं. एकंदरीत उद्योगधंद्यात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच कारण उद्योगात पडणे म्हणजे खूप मोठी जोखीम जिथे तुमच्याकडे असलेले सर्वकाही तुम्ही हरवून बसाल आणि जेव्हा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा साहस नव्हे तर सुरक्षिततेला अधिक प्राधान्य असते त्यामुळे कदाचित उद्योगधंद्यात मराठी माणसाचे प्रमाण अगदीच नगण्य होते. पुढे वाचा>>>