Taking charge of Time

नुसती वाट पाहून हाती येतं फक्त म्हातारपण

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे.
काही असेही असतात जे यश मिळविण्याची फक्त इच्छा व्यक्त करतात तर काही यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करतात पण फारच थोडे असतात जे हवे असलेले यश संपादन करतात.

कारण इच्छित यशाची प्राप्ती सर्वांनाच होते असेही नाही. मग भले त्यासाठी तुम्ही कितीही मेहनत घेतलीत तरीही. पण ह्याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही नशिबाच्या भरवशावर राहाल किंवा योग्य वेळेची वाट पहाल…तसेही कित्येकांच्या बाबतीत वाट बघून फक्त आणि फक्त म्हातारपणच येते कधीही न जाण्यासाठी. पण यश मात्र दूरवर कुठेही दिसत नाही.
यश मिळविण्यासाठी तुम्ही कितीही कटिबद्ध असलात तरीही नुसते ‘कटिबद्ध’ होऊन देखील गोष्टी साध्य करता येतातच असेही नाही…परंतु ध्येयाकडे वाटचाल मात्र नक्कीच सुरु होऊ शकते.

ती वाटचाल शिस्तबद्ध असावी आणि ध्येयाकडेच नेणारी असावी ह्यासाठी मात्र काही अनावश्यक गोष्टी आयुष्यातून बाहेर टाकाव्या लागतात. काही नवीन गणिते जुळवावी लागतात. तर काही पळून जाण्याचे मार्ग बंद करावे लागतात. काही वेळ फुकट घालवणारे, ध्येयाच्या विपरीत दिशेकडे घेऊन जाणारे आणि तुम्हाला खोल दरीत लोटणाऱ्या रस्ते व्यवस्थितपणे तपासून बंद करावे लागतात; नाहीतर यश मिळविणे केवळ अशक्यच.
मंत्र यशाचा सेमिनार तुमच्या ह्या यशाच्या प्रवासात मैलाचा दगड बनून तुमचे योग्य मार्गदर्शन करते.

या एक दिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवाल आणि अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in प्रेरणादायी, मंत्र यशाचा and tagged .

Leave a Reply