Sale!

ठाणे- वेळ अनमोल व मंत्र यशाचा कार्यशाळा ०९-१० जून २०१८

10,000.00 8,500.00

Description

वेळ अनमोल व मंत्र यशाचा कार्यशाळा

दोन्ही कार्यशाळा एकत्रितपणे ९ आणि १० जुन २०१८ रोजी. दोन्हीसाठी एकत्रितपणे नोंदणी केल्यास १५००/- रुपयांची घवघवीत सूट असेल. 

सुरुवातीला वेळ अनमोल कार्यशाळेची माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर लगेचच मंत्र यशाचा कार्यशाळेची माहिती दिलेली आहे.

वेळ अनमोल कार्यशाळा

वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन

दैनंदिन जीवनात आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि सहसा एकच पर्याय आपल्याकडे नेहमी असतो आणि तो म्हणजे जिथे आग लागली तिथे विझवा. त्यामुळे आपल्या आवडी-निवडी देखील बहुतेक वेळा परिस्थितीजन्य असतात. आमची कृती देखील त्या परिस्थितीवरच अवलंबून असते त्यामुळे आम्हाला जे काही अगदी मनापासून मिळवायचं असतं ते मिळविण्यास आमच्याकडे वेळ कधीच शिल्लक नसतो. एक ना धड आणि भाराभर चिंध्या हे आमचं नेहमीचेच न संपणारे वास्तव असतं.

आमच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या समस्यांपैकी काही समस्या म्हणजे...

वेळ प्रभावीपणे वापरून नियोजनबद्ध आयुष्य जगायचं तरी कसे?
अपेक्षित फळ एका विशिष्ट वेळेत मिळवावे तरी कसे?
वेळ कसा वापरला तर आयुष्य सार्थकी लागेल?
कुटुंब आणि कार्यालय ह्यात समतोल साधून स्वतःसाठी वेळ कसा काढावा?
थोड्या वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत?
चालढकल करण्याच्या सवयीवर मात कशी करावी?
आयुष्याची अनिश्चितता हाताळावी तरी कशी?

आमच्याकडे सर्व समस्या सोडविण्याचा एकच रामबाण उपाय असतो आणि तो म्हणजे वेळापत्रकात जेवढ्या जास्त गोष्टी टाकता येतील तेवढ्या टाकायच्या आणि तसे केल्याने आपल्या सर्व समस्यांचं निरसन होईल आणि आपले आयुष्य संपूर्णतः बदलून जाईल ही भाबडी आशा किंवा अपेक्षा बाळगायची.

पण...वेळापत्रकात जे जे टाकलेले असते ते काही ना काही कारणांनी अपूर्ण राहते आणि सरसकट आजचे उद्यावर ढकलले जाते. त्यानंतर उद्याचे परवावर; लवकरच आम्हाला जाणीव होते की तो उद्या/परवा परत कधी आमच्या आयुष्यात उगवतच नाही.

त्यामुळे आमची कामेच नाही तर आमचे आयुष्य देखील कुठेतरी त्रिशंकू प्रमाणे अधांतरी लटकत राहते पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये. पुढे जाता येत नाही आणि मागेही परतता येत नाही.
हे सर्व गोष्टींमध्ये ऐकायला छान वाटत असतील परंतु प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच नाही. पण तरीही हे प्रत्यक्षात अनुभवण्याची पीडा आपल्यापैकी खूप जणांनी भोगलेली असते किंवा अजूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण सतत शोधत असतो.

वेळेचे व्यवस्थापन केल्याशिवाय आयुष्याचे व्यवस्थापन करणे केवळ अशक्य असते पण आम्ही मात्र कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःवर जेवढा जास्त होईल तेवढा दबाव टाकत असतो पण शेवटी एक वेळ अशी येते जिथे मन आणि शरीर साथ सोडते आणि ध्येय कायम अधांतरी राहतात किंवा कायमचे लुप्त होऊन जातात.

जर ह्या त्रिशंकू अवस्थेतून बाहेर पडायचे असेल आणि वरील प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर...
वेळ अनमोल कार्यशाळेत आजच नोंदणी करून तुम्हाला हवे असलेले परिणाम मिळवायला शिका.

वेळ अनमोल ह्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये तुम्हाला नेहमीच हवे असणारे परिणाम मिळवायला शिका आणि त्याचबरोबर दडपण, ताण-तणाव आणि चालढकल वगैरे कसे हाताळावे तेही शिका; फक्त एकाच दिवसात!!!

वेळ अनमोल कार्यशाळेमध्ये भाग घेतलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार सेमिनारनंतर त्यांनी मुख्यतः खालील फायदे अनुभवले आहेत:-

वेळ व्यवस्थापनाचे महत्व
वेळ व्यवस्थापनामधील अडचणींवर मात
वेळमर्यादा पाळणे
चालढकल आणि टाळाटाळा हद्दपार
नियोजन
आयुष्याच्या दिशा
ताण-तणाव व दडपण हाताळणे
आयुष्याचा समतोल

कार्यशाळा कुणासाठी?
तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी, खासगी कर्मचारी, सरकारी कर्मचारी असाल किंवा अगदी सेवानिवृत्त; अगदी सर्वांसाठीच लाभदायक.

 

मंत्र यशाचा कार्यशाळा

स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी

ज्याला यश नको आहे अशी व्यक्ती ह्या जगात कदाचित शोधूनही सापडणार नाही. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी परंतु आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. आपण कोणती कामे करणार किंवा कोणती कामे सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती यश किंवा अपयश मिळालं यावरच ठरते. त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो.

पण काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडू शकत नाही पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही.

अशावेळी लोकं आपल्याला सांगतात “कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता आहात, त्या ऐवजी थोडा सकारात्मक विचार करा म्हणजे यश तुमचेच असेल”.

मग लगेचच आपण ठरवतो देखील की आता मी फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करणार. पण जेमतेम २/३ मिनिटे किंवा काही सेकंद आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”,

पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते की दृष्टीकोन बदलतात तरी कसा? ते जे सांगताहेत त्याप्रमाणे खरेच घडते किंवा नाही ह्याची पडताळणी देखील त्यांनी केलेली नसते आणि दृष्टीकोन बदलल्यावर काय घडते याचा अनुभवही घेतलेला नसतो. त्यांनी देखील ते कुठेतरी ऐकलेले असते आणि असे ऐकीव ज्ञान दुसऱ्यांना सांगायला एकदम मस्त वाटते म्हणुन ते ज्ञान??? आपल्याला चिटकवून, तसं करायला ते सांगून टाकतात.

जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते. फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाडा नेहमीप्रमाणे तसाच पुढे ढकलत राहतो.

जर माणसाची बौद्धिक, मानसिक किंवा शारीरिक पात्रता यश ठरवत असती तर आज प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती यशस्वी असती. प्रत्येक शारीरिकदृष्ट्या मजबूत माणूस दुसऱ्यांवर भारी पडला असता; पण तसं नसतं.

प्रत्येक कामात यश मिळणारच ही शाश्वती असतेच असे नाही तरीही प्रत्येकजण आपापल्यापरीने कार्यरत असतोच आणि आपापल्या कुवतीनुसार एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचलेलाही असतो. कमीजास्त प्रमाणात यश-अपयश प्रत्येकाने अनुभवलेले असतेच...

मग ही कार्यशाळा कुणासाठी? आणि कुणी ती का करावी?

-आयुष्यात एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर सुद्धा तिथेच न थांबता त्याच्याही पुढे जाण्याचा निर्धार करणाऱ्या लोकांसाठी.
-नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्यांसाठी
-खूप सारे प्रयत्न करूनही आलेले अपयश पचवून पुन्हा उठून उभे राहणाऱ्यांसाठी.
-सतत दबावाखाली आणि काही करण्याची धमकच संपलेल्या पण तरीही यशाची स्वप्ने बघणाऱ्या लोकांसाठी.
-संपूर्ण निराशावादी पण तरीही चमत्कार घडला तर बरा अशी अपेक्षा असणाऱ्यांसाठी

कदाचित ह्या सुचीपेक्षा तुमचा एखादा वेगळा स्तर असू शकेल. तुम्ही एकमेकांपासून कितीही भिन्न असलात किंवा तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्तरावर का असेना पण यशप्राप्ती हे मात्र सर्वांचेच ध्येय असते आणि ते ध्येय प्राप्त करण्यावर सर्वांचेच एकमत असते.

मग भलेही तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी किंवा खासगी किंवा सरकारी कर्मचारी असाल किंवा सेवानिवृत्त असा; अगदी कुणीही.

तुम्हाला हे पक्के ठाऊक असते की तुम्ही जिथे आहात त्याच्याही खूप पुढे गेला असतात जर.................................(गाळलेल्या जागा प्रत्येकाने आपापल्या मनातील जर/तर ने भराव्यात)

मंत्र यशाचा ह्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.

या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवायला शिकाल आणि अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

कार्यशाळेचे फायदे

अपयशाची भीती हद्दपार
जिथे मी तिथे संधी
प्रतिबंधक समजुतीपासून मुक्ती
स्वाभिमान आणि आत्मविश्वास
निर्णय घेण्याची क्षमता