Sale!

मंत्र यशाचा कार्यशाळा (23-25 August 2024)

Original price was: ₹12000.Current price is: ₹9000.

Start: August 23, 2024 at 6:00 pm Finish: August 25, 2024 at 9:00 pm
×

मंत्र यशाचा कार्यशाळा (23-25 August 2024) #1

9000

Description

स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी...

'लाईफ कोच व बिजनेस मेंटर' शैलेश तांडेल यांची
यशप्राप्तीवर ३ दिवसांची कार्यशाळा...

'मंत्र यशाचा'

तुमच्या खऱ्याखुऱ्या अडचणींना हाताळण्यासाठी व यशप्राप्तीवर प्रभुत्व मिळवून स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी
३ दिवसांच्या कालावधीत घडणारे एकूण ९ तासांचे, परस्परसंवादी ऑनलाईन लाइव्ह सत्रे

ज्याला यश नको आहे अशी व्यक्ती ह्या जगात कदाचित शोधूनही सापडणार नाही कारण आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. बरोबर ना???

  • तुम्हाला खरोखरच यशस्वी होऊन जिथे आहात त्याच्या खूप पुढे जायचे आहे? खरोखर???
  • मग जे हवं आहे ते मिळविण्यासाठी कोण थांबवतोय तुम्हाला आणि कशाची वाट पाहत आहात तुम्ही?
  • तुमच्या आयुष्याच्या योजना पैशाअभावी थांबल्यात की योग्य व्यक्तीच्या अभावामुळे की परिस्थिती तुम्हाला प्रतिकूल आहे म्हणून?

परिस्थिती अनुकूल असेल तर आम्हाला कुणीही थोपवू शकत नाही पण जर प्रतिकूल असेल तर मात्र बहुतेकवेळा आम्ही परिस्थितीला शरण जाऊन कसंतरी आयुष्याचा रामरगाडा रडतखडत पुढे ढकलत असतो. बरोबर ना???

असं नाही आहे की आम्ही परिस्थितीला नामोहरण करण्यासाठी झटत नाही पण बहुतेकवेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की आम्हाला त्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच उरत नाही.

स्वप्नांना नशिबावर सोडून देण्यापूर्वी कदाचित तुम्ही देखील स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असेल तर काही बाबतीत अजूनही आशा पल्लवित असतील...

'कारण काहीही झाले तरीही आम्हाला यश हवेच असते आणि ज्याला यश नको आहे अशी व्यक्ती कदाचित या जगात शोधूनही सापडणार नाही'

आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी परंतु आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान मात्र कित्येकदा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. आपण कोणती कामे करणार किंवा कोणती कामे सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती यश किंवा किती अपयश मिळाले यावरच ठरते आणि त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो.

पण...

काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडूच शकत नाही पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही.

अशावेळी लोकं आपल्याला सांगतात “कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता आहात, त्या ऐवजी थोडा सकारात्मक विचार करा म्हणजे यश तुमचेच असेल”.

मग लगेचच आपण ठरवतो देखील की आता मी फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करणार. पण जेमतेम २/३ मिनिटे किंवा काही सेकंद आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”, पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते की दृष्टीकोन बदलतात तरी कसा?

ते जे सांगताहेत त्याप्रमाणे खरेच घडते किंवा नाही ह्याची पडताळणी देखील त्यांनी केलेली नसते आणि दृष्टीकोन बदलल्यावर काय घडते याचा अनुभवही घेतलेला नसतो. त्यांनी देखील ते कुठेतरी ऐकलेले असते आणि असे ऐकीव ज्ञान दुसऱ्यांना सांगायला एकदम मस्त वाटते म्हणुन ते ज्ञान??? आपल्याला चिटकवून, तसं करायला ते सांगून टाकतात.

जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते. फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाडा नेहमीप्रमाणे तसाच पुढे ढकलत राहतो.

जर माणसाची बौद्धिक, मानसिक किंवा शारीरिक पात्रता यश ठरवत असती तर आज प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती यशस्वी असती. प्रत्येक शारीरिकदृष्ट्या मजबूत माणूस दुसऱ्यांवर भारी पडला असता; पण तसं नसतं.

प्रत्येक कामात यश मिळणारच ही शाश्वती असतेच असे नाही तरीही प्रत्येकजण आपापल्या परीने कार्यरत असतोच आणि आपापल्या कुवतीनुसार एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचलेलाही असतो. कमीजास्त प्रमाणात यश-अपयश प्रत्येकाने अनुभवलेले असतेच...

मग ही कार्यशाळा कुणासाठी? आणि कुणी ती का करावी?

  • आयुष्यात एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर सुद्धा तिथेच न थांबता त्याच्याही पुढे जाण्याचा निर्धार करणाऱ्या लोकांसाठी.

  • नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्यांसाठी

  • खूप सारे प्रयत्न करूनही आलेले अपयश पचवून पुन्हा उठून उभे राहणाऱ्यांसाठी.

  • सतत दबावाखाली आणि काही करण्याची धमकच संपलेल्या पण तरीही यशाची स्वप्ने बघणाऱ्या लोकांसाठी.

  • संपूर्ण निराशावादी पण तरीही चमत्कार घडला तर बरा अशी अपेक्षा असणाऱ्यां लोकांसाठी सुद्धा.

कदाचित ह्या सुचीपेक्षा तुमचा स्तर थोडा वेगळा असू शकतो पण तुम्ही कोणत्याही स्तरावर का असेना पण काही स्वप्ने व ध्येय उराशी नक्कीच बाळगून असाल आणि त्याच्या पूर्ततेसाठी जर दिवसरात्र एक करत असाल तर ही मंत्र यशाचा कार्यशाळा तुमच्याचसाठी आहे.

मग भलेही तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी, खासगी / सरकारी कर्मचारी असाल किंवा सेवानिवृत्त; अगदी कुणीही.

तुम्हाला हे पक्के ठाऊक असते की तुम्ही जिथे आहात त्याच्याही खूप पुढे गेला असतात जर ..............................................................................................................................

(गाळलेल्या जागा तुम्ही तुमच्या मनातील जर/तर ने भराव्यात)

मंत्र यशाचा कार्यशाळेमध्ये तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, अविरत एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.

'लाईफ कोच व बिजनेस मेंटर' शैलेश तांडेल यांच्या यशप्राप्तीवरील 'मंत्र यशाचा' कार्यशाळेत तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवायला शिकून अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

कार्यशाळेचे फायदे

  • स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची मानसिकता

  • जिथे मी तिथे संधी

  • तणावमुक्त जीवनशैली

  • उत्साही जीवन

  • ध्येयाची स्पष्ट कल्पना

  • प्रतिबंधक समजुतीपासून मुक्ती

  • स्वाभिमान

  • आत्मविश्वास

  • निर्णय घेण्याची क्षमता

  • अपयशाची भीती हद्दपार

PAY NOW

Life Coach | Business Mentor | Shailesh Tandel |

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या १०/१५ वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये परिस्थिती उद्योगाला तेवढी पूरक नव्हती. त्यावेळी मराठी माणूस आणि उद्योग म्हणजे जशी उत्तर आणि दक्षिण धृवाची परस्परविरोधी.टोकं. एकंदरीत उद्योगधंद्यात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच कारण उद्योगात पडणे म्हणजे खूप मोठी जोखीम जिथे तुमच्याकडे असलेले सर्वकाही तुम्ही हरवून बसाल आणि जेव्हा  पुढे वाचा>>>

PAY NOW

Please Fill The Form To Reach Us Or Simply Call on 7208112331 Now