आमच्याबद्दल

सर्चलाईट हा एक टेहळणीसाठी असलेला प्रचंड झोताचा दिवा असतो. मराठीत आपण त्याला शोधक दिवा म्हणू शकतो. ज्याला तुम्ही कोणत्याही दिशेने फिरवू शकता. डाव्या-उजव्या, मागे-पुढे, खाली-वर किंवा गोलाकार; अगदी ३६० अंशात कशाही प्रकारे हा फिरवला जाऊ शकतो.

आपण ज्या वस्तुवर लक्ष केंद्रित करु किंवा आपणाला हवे आहे त्या दिशेने आपण हा फिरवु शकतो. आपल्या रोजच्या वापरातील दिव्याचा प्रकाश एकाच वेळी सर्व दिशांना विखुरला जातो पण सर्चलाईट फक्त आपले लक्ष्य प्रकाशझोतात आणतो.  ह्याचा वापर खूप प्रकारे आणि खुप साऱ्या गोष्टींसाठी केला. अगदी सैन्यात देखील शत्रूला शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.

असाच ३६० अंशात फिरणारा सर्चलाईट आमच्या प्रत्येकामध्ये विसावलेला असतो आणि तो प्रज्वलित करण्यासाठी आवश्यक असलेली ठिणगी देखील आमच्याच ठायी असते. गरज असते ती फक्त त्याचा मेळ साधून योग्यवेळी एखादा बटन दाबण्याची.

समस्या वय विचारून येत नाहीत त्यमुळे तुमचे वय काहीही असो त्या येतातच. तुम्ही अगदीच तरुण असाल किंवा किंचित वार्धक्याकडे झुकलेले मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध व्यक्ती असाल, पण कोणती ना कोणती तरी समस्या प्रत्येकाला भेडसावत असतेच आणि त्यातल्या काही समस्या तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवत देखील असाल. मोठ्या सामर्थ्याने तुम्ही त्या हाताळत असाल जेणेकरून तुम्हाला हवं असलेले आयुष्य तुम्ही उभे करू शकाल.

कित्येक वेळा आपण आपल्याला जे हवे असते त्याच्या अगदी उबंरठ्यात उभे असतो एक पाऊल पुढे आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडणार असतो पण कुठे तरी माशी शिंकते आणि होत्याचे नव्हते होते. सर्व उपाय, सर्व पद्धती संपलेल्या असतात वेग थंडावलेला असतो, सहजपणे ज्या गोष्टी पर्यंत पोहचु असे वाटत असताना ती गोष्ट दुर गेलेली असते किंवा नशीबानेच मिळेल याची खात्री झालेली असते आणि हे असे का झालं याचं उत्तर देखील आपल्या कडे नसते.

प्रश्नांची फक्त उत्तरे मिळवून चालत नाही तर त्याचबरोबर जीवनाला एक आकार आणि दिशा मिळणे देखील तेवढेच महत्वाचे असते. आमच्या आयुष्याला एक ठराविक गती नक्कीच असते परंतु ती चमत्कारात परावर्तीत करण्यास आम्ही कुठेतरी कमी पडतो. तीच उणीव भरून काढून तुमच्यातील सर्चलाईट शोधण्यास तुम्हाला सहकार्य करण्यासाठीच सर्चलाईट विधीनची स्थापना १६ मार्च २०१० रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली.

सर्चलाईट विधीन आयोजित कार्यशाळांमध्ये तुम्ही या घटना किंवा उद्देश पडताळुन पाहता आणि त्याची दुसरी बाजू प्रकाश झोतात आणता आणि तुमच्या समोर एक वेगळं विश्व उभे राहते. स्वप्नांचे पर्यावसन वास्तवात होते जीवनाला नवी पालवी फुटते, जीवनात पून्हा ऋणांनुबंध जुळायला लागतात आणि जीवन प्रेमाने भरुन जाते व सर्वांगाने समतोल बनते. या सर्व प्रक्रियेत तुमच्यातील दडलेला नायक अस्तित्वात येतो आणि चमत्कार घडवणे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होऊन जातो.

ही कार्यशाळा प्रशिक्षक आणि सहभागी यांच्यामधील परस्पर संवादातून आकाराला येतो. ह्या संवादातून संबंधित व्यक्ती थेट आपल्या स्वताच्या आयुष्याकडे पाहायला सुरुवात करते. ह्या कार्यशाळांमध्ये कोणत्याही काल्पनिक किंवा गृहीत धरलेल्या समस्यांवर काम न होता तुमच्या वास्तविक आयुष्यातील समस्यांचं निराकरण केले जाते.
तुमचं हृदय जे मिळविण्यासाठी धडधडते त्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. ज्याचे खऱ्या अर्थाने जनक तुम्हीच स्वतः असता त्यामुळे हे ज्ञान फक्त एखाद्या कागदापर्यंतच मर्यादित न राहता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम बनविते.

कार्यशाळेची आखणी आणि मांडणी अशा प्रकारे केलेली आहे की जी सर्व स्तरावरच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध झाली आहे.

तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी, खासगी कर्मचारी, सरकारी कर्मचारी असाल किंवा अगदी सेवानिवृत्त; सर्वांसाठीच लाभदायक.

शैलेश तांडेल यांच्या बद्दल>>>