उद्योजकाची शिस्त

कोणत्याही कंपनीचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते. शिस्त असेल तर प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियोजनानुसारच घडत असते. नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने यश मिळेलही पण तीच किमया कायम साधणे शक्य नसते. शिस्त नसेल तर जिंकणे फक्त नशिबाचाच भाग […]

शैलेश तांडेल

व्यवसाय सुरु करायचा विचार करताय?

सोमवार म्हणजे रविवारची सुट्टी मनसोक्त उपभोगल्यानंतर अंथरुणातून उठण्याचा कंटाळा किंवा जबरदस्तीने उठण्याची सजा किंवा काहीतरी मनाविरुद्ध, वगैरे वगैरे वगैरे… सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा माझ्या बाबतीत कधीच नव्हता कारण कामे टाळण्याचा स्वभाव अगदी सुरुवातीपासूनच नसल्याने सर्वच दिवस माझ्यासाठी सारखेच. हे सांगायचं कारण म्हणजे, आजच्याच दिवशी ३२ वर्षांपूर्वी सोमवार दिनांक ६ मार्च १९८९ या दिवशी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर […]

परिक्रमाच तर करत असतो आपण

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परिक्रमाच तर करत असतो आपण. जन्मल्याबरोबर आईला बिलगून राहतो आणि जरासे पाय फुटले की सतत तिच्या आणि वडिलांच्या पुढेमागे घिरट्या घालायला लागतो. थोडेसे मोठे झालो की मित्र मैत्रिणीच्या मागेपुढे प्रदक्षिणा व्हायला लागतात. कालांतराने बॉसच्या आणि कुटुंबाच्या गोल गोल परिक्रमा करण्यात आणि पैशाच्या परिक्रमेत तर आयुष्य निघून जाते त्यामुळे तुम्ही कुणीही असा पण प्रदक्षिणा किंवा […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराणा कावकाव त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे जाणवतो. दोन सारख्याच दिसणाऱ्या पण […]

अंधाराशी लढण्याऐवजी प्रकाश निर्माण करूया

नकारात्मक लोकांना प्रत्येक उपायात समस्या दिसते आणि खरोखरच्या समस्येत हीच लोकं ऑस्ट्रीच पक्षासारखी जमीनीत मान खुपसून बसतात. माझ्या कार्यशाळेत कित्येकदा मी लोकांकडून अशी काही कामे / ऍक्टिव्हिटीज करून घेतो जी करायला काही लोकांना विचित्र वाटते पण ती केल्यानंतर त्यांना जाणवतं की हे सर्व त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे. कार्यशाळेत मोजकीच लोकं असतात आणि इथे प्रश्न १३० […]

संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो

प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच जगत कल्याणासाठी श्रीविष्णूने घेतलेला सातवा अवतार. पण माझ्या मते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम. राम […]

Opeing Door to Success

दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो

काही दरवाजे जरी उघडले तरीही ते आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत कारण तो रस्ता नसतोच मुळी. आणि जरी असला तरीही प्रगतीच्या मार्गावर नेणारा तर तो हमखास नसतो. पण असे कितीतरी अनावश्यक आणि दिशाभूल करणारे दरवाजे रोजच्या रोज उघडतच असतात आपल्या आयुष्यात. पण ते कुठे घेऊन जातात हे मात्र काळच ठरवतो. २०१५ च्या वर्ल्डकपची भारत विरुद्ध […]

Blog on Dr. Abdul Kalam

भारताचे अंटार्टिका मिशन आणि डॉक्टर अब्दुल कलाम

काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाचे अंटार्टिका मधील वास्तव्याचे अनुभव ऐकण्यासाठीच मी गेलो होतो. अंटार्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिणेचा निर्मनुष्य भाग. संपूर्ण बर्फाळ प्रदेश जिथे हवा ७०/८० ताशी किलोमीटर वेगाने वाहते त्यामुळे दूर उडून जाऊ नये म्हणून स्वतःला बांधून घ्यावे लागते आणि जिथे उन्हाळ्यात सहा महिने दिवस आणि थंडीत सहा महिने रात्र. आपल्यासारखे १२/१२ तासांनी तिथे दिवसरात्र होत […]

Taking charge of Time

नुसती वाट पाहून हाती येतं फक्त म्हातारपण

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. काही असेही असतात जे यश मिळविण्याची फक्त इच्छा व्यक्त करतात तर काही यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करतात […]

एक पाऊल पुढे टाकून तर बघा

एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात. आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते. आयुष्य त्यांचेच बदलते जे त्या गर्दीतून बाहेर पडायची हिंमत दाखवतात. आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते आपला मार्ग स्वतः निवडतात. कोणत्याही […]

Creating Success

यश त्यालाच मिळते जो…

“कंटाळा आला त्या यशाचा मला. बस्स झाले यश; आता अपयश पाहिजे मला.” असे म्हणणारा मनुष्यप्राणी मला अजून तरी सापडायचा आहे. किंबहुना…ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. पण तरीही मिळते का हो हे यश किंवा यश मिळविण्याचे रसायन? की आयुष्यच एक अजब रसायन बनून जाते त्या यशाचा पाठलाग करता करता. […]