सहा ग्रह आकाशात – दुर्बिणीशिवाय स्पष्ट दर्शन

आपल्याला दररोज उघड्या डोळ्यांनी या विश्वाची भव्य रचना पाहण्याची संधी मिळतेच असे नाही. कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना, मला कोणत्याही दुर्बिणीशिवाय चंद्रासह पाच ग्रह पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली. सूर्य रोज सकाळी दिसतोच आणि ज्यावर आपण जगतोय ती पृथ्वी मोजली तर सात ग्रह. या अलौकिक खगोलीय अनुभवाने मला मंत्रमुग्ध केले, आणि केवळ आकाशाशीच नव्हे तर आपल्या पूर्वजांच्या […]

परिक्रमाच तर करत असतो आपण – जीवनप्रवाह आणि आत्मशोध

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परिक्रमाच तर करत असतो आपण. जन्मल्याबरोबर आईला बिलगून राहतो आणि जरासे पाय फुटले की सतत तिच्या आणि वडिलांच्या पुढेमागे घिरट्या घालायला लागतो. थोडेसे मोठे झालो की मित्र मैत्रिणीच्या मागेपुढे प्रदक्षिणा व्हायला लागतात. कालांतराने बॉसच्या आणि कुटुंबाच्या गोल गोल परिक्रमा करण्यात आणि पैशाच्या परिक्रमेत तर आयुष्य निघून जाते त्यामुळे तुम्ही कुणीही असा, आस्तिक […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराना ‘कावकाव’ त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे […]

मनाप्रमाणे जगण्यासाठी अगोदर मन मोकळे तर करा

काही महिन्यांपूर्वी ’96’ नावाच्या तामिळ चित्रपट मी पाहिला व खूप आवडला मला. तामिळ आणि हिंदी डब ह्या दोन्हींमध्ये मी हा चित्रपट पाहिला आहे. हिंदी डब छानच आहे पण मला तामिळ जास्त आवडला. तामिळ नाही येत मला पण त्याने काहीच अडत नाही कारण हावभाव कळले की भावना व्यक्त होतात आणि भावना कळल्या की अर्थ स्पष्ट होतो […]

अंधाराशी लढण्याऐवजी प्रकाश निर्माण करूया

नकारात्मक लोकांना प्रत्येक उपायात समस्या दिसते आणि खरोखरच्या समस्येत हीच लोकं ऑस्ट्रीच पक्षासारखी जमीनीत मान खुपसून बसतात. माझ्या कार्यशाळेत कित्येकदा मी लोकांकडून अशी काही कामे / ऍक्टिव्हिटीज करून घेतो जी करायला काही लोकांना विचित्र वाटते पण ती केल्यानंतर त्यांना जाणवतं की हे सर्व त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे. कार्यशाळेत मोजकीच लोकं असतात आणि इथे प्रश्न १३० […]

Samay Aur Samaz

पळा पळा पुढे कोण पळे तो…संयम ते काय असतं?????

माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी सहस्त्रावधी लोकांसोबत काम केले आहे. खूपच क्वचित अशा व्यक्ती भेटल्या ज्या एखाद्या ध्येयावर केंद्रित असतील पण तरीही शांत मनाने वावरणारे. बहुतांशी एका जागेवर पाच मिनिटेही स्थिरस्थावर राहू शकत नाहीत अशी. आणि हो, फक्त तरुणाई नव्हे तर वयोमान वाढलेले आणि उच्च पदस्थ किंवा मोठेशे व्यावसायिक सुद्धा. अशा व्यक्ती सुद्धा ज्यांना आयुष्यात जे […]

Gratitude for My Parents — And the Life They Shaped

I woke up that morning in tears. A ward boy from the hospital had arrived at dawn, carrying the news of my father’s passing. It was November 22, 1978. Barely a few weeks had passed since Diwali—a festival we had celebrated with joy—and suddenly, everything came to a halt. My father had never used to […]

संकटांचा सामना संयमाने – श्रीरामाकडून शिकवण

प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच जगत कल्याणासाठी श्रीविष्णूने घेतलेला सातवा अवतार. पण माझ्या मते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम. राम […]

महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिन म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो… वर्षातला एक दिवस महिला दिवस…फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल. प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे शक्य असेल? पण ज्या पश्चिमी देशांमध्ये कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे किंबहुना वेळ काढलाच जात […]

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे…परंतु मोकळा वेळ

सध्याच्या धावपळीग्रस्त आयुष्यात मोकळा वेळ मिळणे कठीण आहे असे म्हणण्यापेक्षा ती एक दुर्लभ आणि चैनीची वस्तू झाली आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असला तरीही ही चैन नाही परवडत आपल्याला. कदाचित अगदी टाटा-बिर्ला किंवा अंबानी-अदानीला देखील ही चैन परवडत असेल किंवा नाही कुणास ठाऊक. पण मोकळा वेळ हे कुणालाही सहसा […]